H3N2 इन्फ्लुएंझा या व्हायरसमुळे कर्नाटकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भारतातला हा इन्फ्लुएंझामुळे झालेला पहिला बळी आहे. कर्नाटकमध्ये या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतात H3N2 ची प्रकरणं वाढत आहेत. डॉक्टरांनी या प्रकरणी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आत्ता अजूनही इन्फ्लुएन्झाबाबत भीतीचं वातावरण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घ्या, मास्क लावा असे सल्ले डॉक्टरांकडून दिले जात आहेत. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काय म्हटलं आहे ICMR च्या तज्ज्ञांनी?

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढले आहेत. इन्फ्लुएंझा व्हायरसचा A सबटाइप म्हणजेच H3N2 या व्हायरसमुळे लोकांना सर्दी-खोकला आणि ताप या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. H3N2 या व्हायरसमुळे लोकांचं रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याचंही ICMR ने म्हटलं आहे. तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने असं म्हटलं आहे की सध्या वातावरणातल्या बदलांमुळेही तापाची साथ येते आहे. हा ताप पाच दिवस ते सात दिवस इतका कालावधी राहतो आहे. IMA ने सर्दी-खोकला आणि ताप आल्यावर अँटी बायोटेक घ्या आणि स्वतःचा बचाव करा असा सल्ला दिला आहे.
आयएमएच्या म्हणण्यानुसार काही काही रूग्ण असेही आहेत ज्यांचा ताप तीन दिवसांमध्ये जातो आहे. मात्र सर्दी आणि खोकला तीन आठवड्यांमध्येही जात नाही. प्रदूषणामुळेही १५ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर लोकांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?
30 bed updated ward at Thane District Hospital for treatment of Zika patients Mumbai print news
झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !
about symptoms treatment vaccine for Bleeding eye disease
जगावर नव्या विषाणूजन्य आजाराचे संकट? डोळ्यातून रक्तस्राव होणाऱ्या नव्या आजारामुळे भीती का निर्माण झाली?
RSS chief Mohan Bhagwat concerned about declining Hindu population says At least two or three children are needed
किमान दोन किंवा तीन अपत्ये गरजेची, हिंदूच्या घटत्या लोकसंख्येवर सरसंघचालक मोहन भागवत यांची चिंता
hiv inceased by 75 percent in young people
एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

इनफ्लुएंझा म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार
इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.

ICMR ने दिल्या माहिनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. मात्र H3N2 प्रकरणं वाढत आहेत. १५ सप्टेंबर नंतर H3N2 ची प्रकरणं वाढली आहेत.

H3N2 ची लक्षणं काय आहेत?

Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.

इन्फ्लुएंझाचा कुणाला जास्त धोका?

इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.

Story img Loader