देशात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला करोनाचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशात ३,७४२ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १२८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये तीन हजार सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये २७१ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात सध्याच्या घडीला १०३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकट्या केरळमध्ये २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले होते. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत.

हे ही वाचा >> Health Special : कोव्हिडच्या नव अवताराचे नाहक भय नको

धनंजय मुंडे यांना करोना

दरम्यान, महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी कोव्हिड-१९ ची तपासणी केली. यामध्ये मी पुन्हा एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास होती नाहीये, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून योग्य उपचार घेत आहे. सध्या काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईन.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India registered 656 new covid 19 cases active patients at 3742 asc
Show comments