देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशात ५७३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील सक्रीय करोनाबाधित रुग्णांची संख्या ४,५६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही वेळापूर्वी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातला एक रुग्ण कर्नाटक आणि दुसरा हरियाणामधील आहे. दुसऱ्या बाजूला करोनाचा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चा प्रादूर्भावही वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात जेएन.१ चे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या सक्रीय जेएन.१ बाधित रुग्णांची संख्या १९७ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत भारतातल्या एकूण दहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत जेएन.१ बाधित रुग्ण आढळळे आहेत. केरळमध्ये ८३, गोव्यात ५१, गुजरातमध्ये ३४, कर्नाटकमध्ये आठ, महाराष्ट्रात सात, राजस्थानमध्ये पाच, तमिळनाडूत चार, तेलंगणात दोन ओडिशा आणि दिल्लीत प्रत्येकी एका जेएन.१ बाधित रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत. नोव्हेंबरमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांची संख्या केवळ १७ होती जी डिसेंबरमध्ये १७९ झाली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी यात १८ रुग्ण वाढून ही संख्या आता १९७ वर गेली आहे. देशात रविवारी ६३६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर १४ जेएन.१ बाधित रुग्ण आढळले होते.

हे ही वाचा >> “ऑलिम्पिक असोसिएशनची समिती आणि माझं निलंबन अमान्य”, संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाविरोधात दंड थोपटले

दुसऱ्या बाजूला देशातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या काही महिन्यांपूर्वी ९०० पेक्षा कमी झाली होती. जी आता ४५०० हून अधिक आहे. करोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेच्या काळात ही संख्या ४.५ कोटींच्या पुढे होती. आतापर्यंत देशात ५.३ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ४.४४ कोटी लोकांनी करोनावर मात केली आहे. भारतात करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.८ टक्के इतके आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार करोनावरील लशीचे देशभरात २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India reports 573 new covid cases 2 deaths in last 24 hours 197 jn 1 cases asc
Show comments