भारत आणि चीन यांच्यातील संबंध सीमाभागातील घडामोडींमुळे कायम तणावपूर्ण राहिले आहेत. पश्चिमेकडे चीननं भारताच्या काही भूभागावर दावा सांगितला असताना दुसरीकडे पूर्वेकडेही अरुणाचल प्रदेशमधील मोठ्या भागावर चीनकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. आता तर अरुणाचल प्रदेशमधील तब्बल ११ ठिकाणांचा उल्लेख ‘दक्षिण तिबेट’ असा करून चीननं या ठिकाणांची चिनी नावंच जाहीर केली आहेत. या पार्श्वभूमवीर भारतातून त्यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त होत असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात सविस्तर भूमिका जाहीर करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

चीनच्या नागरी कामकाज विभागाने रविवारी अरुणाचल प्रदेशमधील एका मोठ्या भूभागाचा उल्लेख ‘दक्षिण तिबेट’ असा केला. यानंतर या भागातील ११ ठिकाणांची चिनी नावं चीनकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये थेट अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरजवळच्या एका ठिकाणाचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत चीनकडून अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेली ही तिसरी यादी आहे. याआधी २०१७ मध्ये चीनकडून ६ ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०२१मध्ये १५ जागांची यादी जाहीर केली होती.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

भारतानं चीनला सुनावलं!

दरम्यानं, चीननं केलेल्या या आगळिकीबाबत माध्यमांमधून माहिती समोर आल्यानंतर भारतानं त्यावर परखड शब्दांत चीनला ठणकावलं आहे. “आम्ही यासंदर्भातल्या बातम्या वाचल्या. चीनकडून असा प्रयत्न पहिल्यांदाच होत नाहीये. आम्ही ही यादी फेटाळून लावत आहोत. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे”, अशा शब्दांत भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनला सुनावलं आहे.

चीन सुधरेना! आता अरुणाचल प्रदेशमधल्या ११ ठिकाणांची चिनी नावं केली जाहीर; एक तर थेट इटानगर…

“अशा प्रकारे वेगळी नावं दिल्यानं अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या वास्तवात कोणताही बदल होणार नाही”, असंही अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे.

Story img Loader