कोलकाता : देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वेची (अंडरवॉटर मेट्रो ट्रेन) सेवा शुक्रवारी कोलकाता सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ शेकडो प्रवाशांनी घेतला. त्यांनी आपल्या पहिल्या प्रवासाचा आनंद साजरा केला. नदीखालील बोगद्यांच्या आतील भिंतीवर निळ्या प्रकाशाने विशेष रोषणाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकात्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरवरील हावडा मैदान स्टेशनवरून सकाळी ७ वाजता मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात झाली. यावेळी प्रवाशांनी जयघोष करत टाळ्या वाजवत आनंद साजरा केला. त्याचवेळी दुसऱ्याने एस्प्लानेड स्टेशनवरून प्रवास सुरू झाला. ही मेट्रो सेवा सुरु होण्यासाठी पहाटेपासून स्थानकांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा >>> पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कंपनीकडून भारतातल्या राजकीय पक्षांना देणग्या? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

तिकीट काढण्यासाठी सुमारे ४.८ किमीची लांब होती. यावेळी मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. हावडा मैदान स्थानकावरील प्रवाशांच्या एका गटाने मेट्रोमध्ये चढताना जय श्री रामचा नारा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी थोडा गोंधळ उडाला.

देशात पहिल्यांदा कोलकाता येथे मेट्रो सेवा सुरू झाली होती. आता कोलकाता शहराने पाण्याखालून धावणारी मेट्रो सेवा सुरू करून इतिहास रचला आहे. या मेट्रो प्रकल्पात पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरच्या हावडा मैदान ते एस्प्लेनेड विभाग दरम्यान नदीच्या खाली ४,९६५ कोटींचा भारतातील पहिला ट्रान्झिट बोगदा तयार करण्यात आला आहे. पाण्याखालील मेट्रो मार्ग ४.८ किलोमीटर लांबीचा असून हावडा मैदान ते एस्प्लेनेडला जोडला आहे. या विभागात, हावडा मैदान हे पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत सॉल्ट लेक सेक्टर व्ही शी जोडले जाईल. हावडा आणि सॉल्ट लेक ही शहरे हुगळी नदीच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s first underwater metro train services begin in kolkata zws