भाजपा पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद जगभरात उमटत आहेत. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेनेही या टिप्पणीची निंदा केली असून संयुक्त राष्ट्राकडे योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर आता भारतानेदखील प्रतिक्रिया दिली असून ओआयसीची ही मागणी म्हणजे अवास्तव आणि संकुचित विचार आहे, असे भारताने म्हटले आहे.

हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल सौदी अरेबियाची नाराजी; नुपूर शर्मांच्या निलंबनाचं स्वागत

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर ओआयसीने भारतावर टीका करत योग्य ती कारवाई करण्याची संयुक्त राष्ट्राकडे मागणी केली आहे. त्याला उत्तर म्हणून भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ओआयसीच्या या मागणीला अवास्तव आणि विभाजनवादी अजेंडा म्हटलं आहे. “ओआयसीच्या प्रवक्त्यांनी भारताविषयी टिप्पणी केली आहे. भारत सरकार या टप्पणीला फेटाळत असून ही टिप्पणी अवास्तव आणि संकुचित विचार स्पष्ट करणारी आहे,” असं बागची यांनी म्हटलंय.

हेही वाचा >> “भाजपाला आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे”; नुपूर शर्मांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

तसेच “धर्मावर जी अवमानकारक टिप्पणी करण्यात आली तिचा भारत सरकारशी संबंध नाही. अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर संबंधित संस्थेकडून यापूर्वीच कठोर कारवाई करण्यात आली आहे,” असेदेखील परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

हेही वाचा >> Sidhu Moosewala Murder: मुसेवाला प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन; पुण्यातून दोन शार्प शुटर्सला अटक

तसेच ओआयसीने केलेल्या मागणीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले असून “ओआयसी सचिवालयाने पुन्हा एकदा प्रेरित तसेच दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून ओआयसीचा विभाजनवादी अजेंटा उघड होत आहे. ओआयसीने सांप्रदायिक दृष्टीकोन सोडावा तसेच ओआयसीने सर्व धर्मांप्रती योग्य आदर दाखवावा,” असेदेखील परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा >> “इस्लामिक देशांनी पावले उचलल्यानंतर भाजपाने…”; नुपूर शर्मांवरील कारवाईवरुन काँग्रेसची टीका

दरम्यान, भाजपाने नुपूर शर्मा यांना निलंबित केलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यार अवमानकारक टिप्पणी केली होती. ही चर्चा ज्ञानवापी मशिदीवरील वादावर आधारित होती.

Story img Loader