पाकिस्तानी फौजांनी सोमवारी काश्मिरातील गुरेझ क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय चौक्यांवर तोफा व मशीनगन्सचा मारा केला. यात सैन्याचे दोन जवान शहीद झाले.
पाकिस्तानी फौजांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुरेझ क्षेत्रात गोळीबार सुरू करून शस्त्रसंधीचा भंग केला. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने स्वयंचलित रायफल्स, मशीनगन्स व तोफांच्या साहाय्याने भारतीय चौक्यांना लक्ष्य केले, असे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले.
कुठल्याही चिथावणीशिवाय पाकने केलेल्या या गोळीबाराला भारतीय फौजांनी चोख प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ नोव्हेंबरला जम्मू- काश्मीरला भेट देणार आहेत.