मालदीवमधील जलसंकटावर मात करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी मालदीवची राजधानी माले येथे भारताने पाच जलवाहू विमाने पाठवली. भारताकडून प्रथमच एखाद्या देशाली इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
माले येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला आग लागून हा प्रकल्प खाक झाला. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही हॉटेल व पाणीविक्री करणाऱ्या दुकानांवर दरोडेही टाकण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर मालदीवने भारताकडे पाण्यासाठी विनंती केली होती.

Story img Loader