पीटीआय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने रविवारी युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी वैद्यकीय मदत आणि अन्य उपयुक्त साहित्याची मदत पाठविली. हवाई दलाचे ‘सी-१७’ मालवाहू विमान इजिप्तच्या अल-अरिश विमानतळाकडे सामग्रीसह रवाना झाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी ‘एक्स’ संदेशाद्वारे याबाबत दिली. ‘भारताने पॅलेस्टाईनवासीयांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवली आहे. अंदाजे साडेसहा टन पूरक वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन हवाई दलाचे विमान इजिप्तकडे रवाना झाले आहे. यात जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त साधने, तंबू, बिछाने, ताडपत्री, स्वच्छता साहित्य, जलशुद्धीकरण औषधे आदीचा समावेश आहे,’ अशी माहिती बागची यांनी दिली. गाझा येथील रुग्णालयात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केल्यानंतर आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षांच्या मुद्दय़ावर भारताने दीर्घ काळापासून अवलंबलेल्या तात्त्विक भूमिकेचा पुनरुच्चार केल्यानंतर तीन दिवसांनी भारताने ही मदत पाठवली आहे.

पॅलेस्टाईनवासीयांना मानवतावादी दृष्टिकोनातून साडेसहा टन पूरक वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य पाठवण्यात आले आहे. – अिरदम बागची, परराष्ट्र प्रवक्ते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sends aid to war torn palestine amy
Show comments