नेपाळसह संपूर्ण उत्तर भारताला हादरवून टाकणाऱ्या भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालयाचे दिवसभर बारकाईने लक्ष होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, सिक्कीमचे पवनकुमार चामलिंग, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच संवाद साधला. नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला व राष्ट्रपती रामबरन यादव यांच्याकडून मोदींनी स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. भूकंप झाल्यानंतर अवघ्या तासाभरात पंतप्रधानांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र, एनडीआरएफ व राष्ट्रीय हवामान विभागाचे प्रमुख उपस्थित होते. नेपाळ दौऱ्यावर असलेल्या भारतीय पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारने दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनात मदतकेंद्र उभारले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेदेखील नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
विमान उड्डाणे स्थगित
भूकंपामुळे नेपाळच्या मध्यभागात इमारतींचे प्रचंड नुकसान होऊन, विमानतळावरील धावपट्टी बंद झाल्याने भारतातील हवाई वाहतूक सेवांनी नेपाळची राजधानी काठमांडूला जाणारी विमान उड्डाणे स्थगित केली आहेत. सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया, तसेच इंडिगो व स्पाइसजेट या खासगी कंपन्यांनी नेपाळच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत काठमांडूची उड्डाण सेवा स्थगित ठेवली आहे.
मदत पाठविण्यात भारताची तत्परता
नेपाळसह संपूर्ण उत्तर भारताला हादरवून टाकणाऱ्या भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालयाचे दिवसभर बारकाईने लक्ष होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, सिक्कीमचे पवनकुमार चामलिंग, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2015 at 01:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sends aircrafts with relief supplies team to nepal