तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या तीन भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा ३ हजारच्या पार गेला आहे. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं.

त्यानुसार तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह एनडीआरएफचं पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत.

Story img Loader