भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये डंकन हॅल्डेन यांचे मत

फगवाडा : ‘भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

फगवाडा येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसदरम्यान हॅल्डेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतात उपयोजित संशोधनाऐवजी मूलभूत विज्ञानावरील संशोधनावर अधिक भर दिला जातो. यासाठी देशात अधिक गुंतवणूक होण्याची आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये धातू विज्ञानासारख्या उपयोजित संशोधनावर गुंतवणूक केली जाते. आशिया खंडात चीन आणि भारत हे दोन देश वेगाने प्रगत करत आहेत. विकसनशील देशांनी ‘ब्रेनगेन’ व्हावा यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. चीनने संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर ‘ब्रेनगेन’ होत आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिका, युरोपमधून संशोधक भारतात परतणे कठीण आहे, असे सांगतानाच शासनाने केवळ योजना आखून उपयोग नाही तर उद्दिष्ट म्हणून कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. परदेशातील संशोधकांसाठी येथे ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ उभारावीत, असेही हॅल्डेन यांनी सांगितले.

Story img Loader