पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी बॉलीवुड अभिनेता शाहरूख खानच्या विधानावरून उठलेल्या वादळामध्ये उडी घेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारत सरकारने शाहरूखला सुरक्षा पुरवायला हवी.
मलिक म्हणाले की, शाहरुख जन्माने भारतीय आहे आणि त्याला नेहमीच भारतीय राहणे आवडेल. मात्र, भारत सरकारला विनंती आहे की त्याला सुरक्षा पुरवण्यात यावी. मी सर्व भारतीय नागरिकांना आग्रह करतो की शाहरुखच्या बाबतीत जे नकारात्मक पध्दतीने बोलत आहेत, त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे तो एक अभिनेता आहे.
शाहरुखवर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधील नागरिक प्रेम करतात, असं सांगत मलिक म्हणाले की, ‘‘मला खात्री आहे की जे कोणी त्याच्या विरोधात बोलत आहेत किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपली धमकी परत घेतील. कलाकाराला सर्वांकडून प्रेम मिळते. कलाकार प्रेम वाटतात आणि ते एकतेचे प्रतीक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा