पीटीआय, कोलकाता

नवी दिल्ली : बांगलादेशात दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांची सुटका होत नाही तोपर्यंत सर्व बांगलादेशींना व्हिसा देणे तातडीने थांबवावे अशी मागणी भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी केली. तर, चिन्मय दास यांच्या अटकप्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली. काँग्रेसनेही दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.कोलकात्याक भाजपच्या नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

Chaos in Parliament on the second day of the winter session
संसदेत पुन्हा गदारोळ,दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमक; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
US French mediation halts Israel Hezbollah war
इस्रायल-हेजबोलामध्ये युद्धविराम; अमेरिका-फ्रान्सच्या मध्यस्थीला यश, जगभरातून स्वागत
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”
Eknath Shinde
Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही, तर…”, ठाकरे गटाचा मोठा दावा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Ajmer Dargah on the site of Shiv Mandir Rajasthan court accepts petition
अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर? राजस्थानातील न्यायालयाकडून याचिकेचा स्वीकार; संबंधितांना नोटिसा

अधिकारी यांच्या नेतृत्वात कोलकात्यामधील बांगलादेश उपउच्चायुक्तालयाला निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, बांगलादेशातील हंगामी सरकार दास यांची तुरुंगातून सुटका करत नाही तोपर्यंत व्हिसा देणे थांबवावे अशी मागणी अधिकारी यांनी केली. तसेच तेथील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत आयात-निर्यात थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.दुसरीकडे, भारत आणि बांगलादेशातील इस्कॉनच्या शाखांनीही दास यांच्या सुटकेची मागणी केली आहे. कोलकात्यामधील इस्कॉनच्या शाखेने सर्व घडामोडींबद्दल केंद्र सरकारला माहिती दिली आहे.