पीटीआय, कोलकाता
नवी दिल्ली : बांगलादेशात दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांची सुटका होत नाही तोपर्यंत सर्व बांगलादेशींना व्हिसा देणे तातडीने थांबवावे अशी मागणी भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी केली. तर, चिन्मय दास यांच्या अटकप्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली. काँग्रेसनेही दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.कोलकात्याक भाजपच्या नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.
अधिकारी यांच्या नेतृत्वात कोलकात्यामधील बांगलादेश उपउच्चायुक्तालयाला निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, बांगलादेशातील हंगामी सरकार दास यांची तुरुंगातून सुटका करत नाही तोपर्यंत व्हिसा देणे थांबवावे अशी मागणी अधिकारी यांनी केली. तसेच तेथील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत आयात-निर्यात थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.दुसरीकडे, भारत आणि बांगलादेशातील इस्कॉनच्या शाखांनीही दास यांच्या सुटकेची मागणी केली आहे. कोलकात्यामधील इस्कॉनच्या शाखेने सर्व घडामोडींबद्दल केंद्र सरकारला माहिती दिली आहे.