कलाम प्रक्षेपण तळावरून उड्डाण
भारताने अग्नी ४ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील किनारी भागात घेतली. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीतांशु धर यांनी सांगितले की, ए.पी.जे अब्दुल कलाम प्रक्षेपण तळावरून सकाळी पावणेदहा वाजता हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. अग्नी १, अग्नी २ व अग्नी ३ तसेच पृथ्वी ही क्षेपणास्त्रे आधीच लष्कराच्या शस्त्रागारात आहेत. त्यामुळे तीन हजार कि.मी.चा प्रदेश भारताच्या पट्टय़ात आला आहे. या चाचणीत टेलिमेट्री, इलेक्ट्रोऑप्टिकल स्टेशन व रडार स्टेशन हे सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी ४ या क्षेपणास्त्राचा पल्ला ४ हजार किलोमीटर असून ते दोन टप्प्यांचे आहे. त्याची लांबी २० मीटर तर वजन १७ टन आहे पाकिस्तान व चीन या देशात अवघ्या वीस मिनिटांत पोहोचण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र आधुनिक असून त्याची विश्वासार्हता अधिक आहे. जहाजांवरून या चाचणीचे निरीक्षण करण्यात आले असे प्रकल्प संचालक श्रीमती टेसी थॉमस यांनी सांगितले. अग्नी ४ क्षेपणास्त्राचे हे चौथे चाचणी उड्डाण होते. यापूर्वी २ डिसेंबर २०१४ रोजी त्याची उपयोजित चाचणी घेतली होती. त्यावर रिंग लेसर गायरो यंत्रणा असून आरआयएनएस ही दिशादर्शन प्रणाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्नी ४ क्षेपणास्त्र
* प्रकार- आंतरखंडीय
* पल्ला- चार हजार किलोमीटर
* लांबी- २० मीटर
* वजन- १७ टन
* वहन- अण्वस्त्रे वाहून नेते.
* बाह्य़ तापमान- ४००० अंश सेल्सियस
* आतील तापमान-५० अंशापेक्षा कमी

अग्नी ४ क्षेपणास्त्र
* प्रकार- आंतरखंडीय
* पल्ला- चार हजार किलोमीटर
* लांबी- २० मीटर
* वजन- १७ टन
* वहन- अण्वस्त्रे वाहून नेते.
* बाह्य़ तापमान- ४००० अंश सेल्सियस
* आतील तापमान-५० अंशापेक्षा कमी