भारताकडून बुधवारी ‘आयआरएनएसएस-१ई’ या पाचव्या नॅव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथून सकाळी ९.३१ मिनिटांनी स्वदेशी बनावटीच्या पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. ‘आयआरएनएसएस-१ई’च्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत आता दळणवळणासाठी स्वतंत्र उपग्रह व्यवस्था असणाऱ्या देशांच्या विशेष गटात सामील होण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहचला आहे. सध्या भारतीय क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणालीत आयआरएनएसएस-१ए, आयआरएनएसएस-१बी, आयआरएनएसएस-१सी, आयआरएनएसएस-१डी आणि आयआरएनएसएस-१ई या उपग्रहांचा समावेश आहे.
भारताच्या पाचव्या नॅव्हिगेशन उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण
स्वदेशी बनावटीच्या पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-01-2016 at 11:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully puts its fifth navigation satellite into orbit