बालासोर : भारताने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एका बेटावरून सुपरसॉनिक मिसाइल—असिस्टेड रिलीझ ऑफ टारपीडो (स्मार्ट) या पाणबुडीविरोधी युद्ध प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्याच आली, असे एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

सकाळी ८.३० च्या सुमारास ग्राउंड मोबाइल लाँचरवरून ही प्रणाली सुरू करण्यात आली.संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की या चाचणीमध्ये सममिती वेगळे करणे, वेग नियंत्रण यासारख्या अनेक पॅरामीटर्सचीही चाचणी घेण्यात आली आणि त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. ‘स्मार्ट’ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र-आधारित हलकी टारपीडो वितरण प्रणाली आहे, जी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेली आणि विकसित केली आहे. जेणेकरून भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता हलक्या वजनाच्या टारपीडोच्या पारंपारिक श्रेणीच्या पलीकडे वाढेल, असे संरक्षण अधिकारी म्हणाले.

‘स्मार्ट’च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे कौतुक केले. ‘प्रणालीच्या विकासामुळे  नौदलाची ताकद आणखी वाढेल,’ असे ते म्हणाले. संरक्षण विभागाचे संशोधन आणि विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनीही संपूर्ण स्मार्ट टीमच्या सहकार्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully tests smart anti submarine zws