मुंबईत २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबतच्या खटल्यावरील पाकिस्तान सुरू असलेल्या सुनावणीत दिरंगाई बाळगली जात असल्यावरून भारताने पाकिस्तानच्या उपायुक्तांना समन्स धाडले आहेत. तसेच या गंभीर प्रकरणावर पाकिस्तानकडून तकलादूपणा केला जात असल्याचे म्हणत भारताने याचा तीव्र निषेध नोंदविला.
दरम्यान, पाकिस्तानातील भारताच्या उपायुक्तांनीही या प्रकणाच्या सुनावणीबाबत सुरू असलेल्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदविला.
‘२६/११’ खटल्याची सुनावणी न्यायाधीश आजारी पडल्याने रखडली
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा पाकिस्तानात सुरू असलेला खटल्याची सुनावणी प्रक्रिया अतिशय मंद गतीने होत असल्याची नोंद पाकिस्तानने घ्यावी असे भारताने म्हटले आहे. तसेच याप्रकरणात हाफीज सईद सुत्रधार असल्याचेही भारताने नमूद केले आहे. २६/११ हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानच्या ‘दहशतवादविरोधी न्यायालया’त सुरू आहे. या खटल्यात ७ आरोपी आहेत. याआधी सुनावणी दरम्यान, न्यायाधीशांनी ‘आपल्याला बरे वाटत नाही’ असे कारण दिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

Story img Loader