अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या माघारीस सुरुवात होण्याच्या प्रक्रियेच्या पाश्र्वभूमीवर तेथे होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी होत असताना तेथील सलोखा प्रक्रियेस भारताने पाठिंबा दिला आहे.
  युद्धजन्य देशात सुरू होणाऱ्या सलोखा प्रक्रियेत लोकांचा सहभाग घडवून आणण्याच्या या निर्णयास भारताचा पूर्ण पाठिंबा राहील, असे परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद यांनी येथे सांगितले.
अफगाणिस्तानात या वर्षी राजकीय आणि सुरक्षा स्थित्यंतर होत असून त्या कामी अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दले महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे खुर्शीद यांनी नमूद केले. अफगाणिस्तानात पहिले कृषी विद्यापीठ उभारण्यात आले असून त्या कामी भारताने मदत दिली आहे. या विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी खुर्शीद बोलत होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई हेही उपस्थित होते.
अफगाणिस्तानचे राष्ट्रीय लष्कर आणि त्यांचे राष्ट्रीय पोलीस दल नव्याने उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने दिलेल्या अभिवचनाचे पालन केले पाहिजे, असेही आवाहन खुर्शीद यांनी केले.

Story img Loader