करचुकवेगिरीसाठी स्विस बॅंकांमध्ये पैसा ठेवलेल्या भारतीयांची नावे तातडीने जाहीर करण्यासाठी केंद्र सरकार स्वित्झर्लंड सरकारला पत्र पाठवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी ही माहिती दिली.
करचुकवेगिरी करणाऱ्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये तेथील सरकारने तेथील बँकांत पैसे ठेवलेल्या काही खात्यांची कसून चौकशी केली. यात ज्यांनी करातून मुक्तता मिळवण्यासाठी पैसा आपल्या देशात आणून ठेवला, त्यांची एक यादी त्यांनी तयार केली. ती लवकरच भारताकडे सोपवली जाईल, असे स्वित्र्झलड सरकारने सांगितले होते. या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकार पत्र लिहून ही नावे लवकरात लवकर देण्याची मागणी करणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने जरी अशा नावाची यादी तयार केली असली, तरी अधिकृतपणे केंद्र सरकारला त्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. काळा पैसा जमा करणाऱयांची नावे लवकर समजण्यासाठी केंद्र सरकार तेथील शासनाला पत्र लिहित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader