भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी भारतदौऱ्यावर आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भारतात शाळकरी मुलाप्रमाणे वागणूक देण्यात आल्याची टीका तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी केली आहे.
नवाझ शरीफ यांनी भारतीय पोलाद क्षेत्रातील दिग्गज सज्जन जिंदाल यांच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीवरही इम्रान खान यांनी टीका केली आहे. जिंदाल यांच्या निवासस्थानाला भेट दिल्याने कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावयाचे याचे शरीफ यांना भान राहिले नसल्याचे प्रतििबबित होत आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे.
नवाझ शरीफ यांचा पुत्र हसन नवाझ हेही उद्योगपती असल्याने हितसंबंधांचा तिढा समोर असतानाही शरीफ हे जिंदाल यांच्या निवासस्थानी कसे जाऊ शकतात, असा सवालही इम्रान खान यांनी उपस्थित केला आहे. पदावर असताना कोणताही पाश्चिमात्य लोकशाहीवादी नेता व्यापार करीत नाही, कारण तेथे हितसंबंधातील तिढा समोर असतो, असेही ते म्हणाले.
जिंदाल यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जाण्यास शरीफ यांना वेळ मिळतो, मात्र हुरियतच्या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, यावरून शरीफ यांना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावयाचे याचे भान राहिले नसल्याचे स्पष्ट होते, असेही खान म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा