पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्करे तैयबा, जमात उद दवा, हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे घेतला. या संघटनांना होणारा अर्थपुरवठा आणि मदतीचा ओघ थांबविण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय या दोन्ही देशांनी घेतला आहे. 
भारताचे अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीची चौथी वार्षिक बैठक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात झाली. त्यावेळी अमेरिकेचे अर्थमंत्री जॅक लेव यांच्यासोबत चिदंबरम यांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर हवाला पद्धतीने होणारे पैशांचे व्यवहार, पैशांची अफरातफर, आर्थिक दहशतवाद या सर्वांचा एकत्रितपणे मुकाबला करण्यावर चिदंबरम आणि लेव यांच्यामधील बैठकीत एकमत झाले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त निवेदनातही या मुद्द्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

Story img Loader