पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा भारताचा मानस आहे परंतु, दहशतवादी घडामोडींना पायबंद घालणे तितकेच महत्वाचे त्याशिवाय दोन्ही देशांतील संबंध दृढ होऊ शकत नाहीत असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पदभार स्विकारताना व्यक्त केले.
तसेच जागतिक स्तरावर परराष्ट्र मंत्रालय भारताची प्रतिमा बळकट करण्यावर आणि शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देईल असेही स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मोदीभेटीवर स्वराज म्हणाल्या की, “देशात बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी घटना घडत राहील्या, तर दोन्ही देशांतील संबंध दृढीकरणाच्या चर्चेचा काहीच परिणाम होणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरीफ यांना सांगितले आहे. तसेच आम्हाला चांगले संबंध हवे आहेत असेही पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. परंतु, दहशतवादी कारवाया संपुष्टात आल्या तरच दोन्ही देशांतील चांगल्या संबंधांना बळकटी येऊ शकते असेही मोदींनी शरीफ यांना सांगितले आहे.”  
तसेच शेजारी देश, सार्क प्रतिनिधी देश, धोरणात्मक भागीदार देश, आफ्रिका, युरोप आणि इत्यादी देशांशी योग्य ताळमेळ राखणे आणि विकासाच्या भूमिकेतू सहकार्य करणे ही आगामी काळात प्राथमिकता असल्याचेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

Story img Loader