नवी दिल्ली : भारत मलेशियाला १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार आहे. वजनाने हलकी असलेली ही खास भारतीय बनावटीची विमाने आहेत. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती देताना सांगितले, की अमेरिकेसह अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे देशही ‘तेजस’ या एकल इंजिन लढाऊ विमानाच्या (जेट) खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या वर्षी भारत सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी विमाननिर्मिती कंपनीस ८३ ‘तेजस’ निर्मितीसाठी सहा अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण २०२३ पासून सुरू होणार आहे. विदेशी संरक्षण उपकरणे आयात व परावलंबित्व कमी करण्यावर मोदी सरकारचा भर आहे. तसेच भारतीय बनावटीची लढाऊ विमाने परदेशी निर्यात करण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.  संरक्षण मंत्रालयातर्फे संसदेत सांगण्यात आले, की गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘रॉयल मलेशियन एअर फोर्स’तर्फे दोन आसनी १८ ‘तेजस’ विमानांचा विक्री प्रस्ताव ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’पुढे ठेवण्यात आला होता.