आर्थिक आकारमानामध्ये भारत अंतिमत: चीनला मागे टाकून पुढे निघून जाईल तसेच दक्षिण आशियात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीतही भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल असे मत असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. डावोस येथे दक्षिण आशिया विषयीच्या सत्रामध्ये ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनचा विकास दर मंदावत असताना भारताची अर्थव्यवस्था वाढतच जाणार आहे असे ते म्हणाले. चीनचा वेग मंदावणार असून भारताची प्रगती सुरुच रहाणार आहे. त्यामुळे दक्षिण आशियात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल. आज हेच काम चीन करत आहे.

भारत आणि चीनमधील ही स्पर्धा प्रदेशाठी चांगली असून त्यातून नक्कीच फायदा होईल असे राजन म्हणाले. चीनने सध्या नेपाळ, पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे राजन यांनी व्यक्त केलेले विचार महत्वपूर्ण आहेत. याच सत्रात नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी चीन आणि भारत दोघांसोबत काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.