अग्नी-५च्या यशानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अग्नी-६ क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत असल्याची घोषणा केली. एकाच क्षेपणास्त्राद्वारे एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असेल. अग्नी-५ प्रमाणेच हे क्षेपणास्त्रदेखील आंतरखंडीय आणि अण्वस्त्रवाहू असेल, असे डीआरडीओचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले.
अग्नी-६ क्षेपणास्त्र किती किलोमीटरवरील लक्ष्य साध्य करेल, याबाबत सारस्वत यांनी माहिती दिली नाही. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राची 5,500 किलोमीटरवरील लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-६ क्षेपणास्त्राची क्षमता यापेक्षा जास्त असेल.
अग्नी-६ क्षेपणास्त्रावर स्वतंत्ररितीने वेगवेगळ्या ठिकाणी अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एका क्षेपणास्त्रातून विविध लक्ष्यांवर मारा करता येईल, असेही सारस्वत यांनी सांगितले.
अग्नी-६च्या निर्मिती आणि यशस्वी चाचणीनंतर भारत या स्वरुपाची क्षेपणास्त्र असणाऱया अमेरिका आणि रशियाच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे, असे डीआरडीओच्या अधिकाऱयांनी सांगितले.
अग्नी-६ क्षेपणास्त्राच्या निर्मितीची भारताकडून तयारी; विविध लक्ष्यं भेदण्याची क्षमता
एकाच क्षेपणास्त्राद्वारे एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-02-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India working on agni vi missile to be in worlds elite nuclear club