जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं ३ फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. २००६ ते २०१८ या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in