कठीण धावपट्टीवर सहजरित्या उतरू शकणारे व लांबवरच्या अंतरापर्यंत सामान वाहून नेऊ शकणारे तिसरे बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर विमान भारतीय वायुसेनेत दाखल करण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेसाठी ग्लोबमास्टर हे विमान अत्यंत महत्तवपूर्ण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील पर्वतीय भागामध्ये सामानाची वाहतूक करण्यात ग्लोबमास्टर महत्वाची कामगिरी बजावणार आहे.
बोईंग कंपनीशी झालेल्या करारानुसार भारतीय वायुसेनेत दहा ग्लोबमास्टर विमाने समाविष्ट करण्यात येणार आहेत. याआधी जून व जुलै महिन्यात दोन ग्लोबमास्टर विमाने वायुसेनेत समाविष्ट करण्यात आली होती. या ग्लोबमास्टर विमानांच्या समावेशानंतर भारत हा अमेरिकेनंतरचा वायुसेनेत ग्लोबमास्टर विमानांची सर्वात मोठी तुकडी बाळगणारा देश होणार असल्याचही माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या अमेरिकेकडे सर्वात जास्त २२२ ग्लोबमास्टर विमाने आहेत. ग्लोबमास्टर रणगाडे व इतर वजनदार वाहने तसेच प्रचंड लष्करी साहित्य वाहून नेऊ शकते. 

Story img Loader