यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.
यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झाली. पण, कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचा सुसान व्होजिकी यांनी सांगितलं.
हेही वाचा : तैवानला शस्त्रे पुरवल्याबद्दल लॉकहीड मार्टिन, रेथेऑन कंपन्यांवर चीनचे निर्बंध
नील मोहन यांनी २००८ साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती. २०१५ साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार पदी नील मोहन यांनी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, सुसान व्होजिकी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अल्फाबेट इंकच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची पडले.