गेल्या काही दिवसात जम्मू खोऱ्यात झालेले दहशतवादी हल्ले आणि दहशतावाद्यांची घुसखोरी झाल्याची शक्यता लक्षात घेता लष्कराने पुर्ण ताकद जम्मू खोऱ्यात पणाला लावली आहे. याआधीच निमलष्करी दल,जम्मू काश्मीर पोलीस दल या व्यतिरिक्त लष्कराचे तीन हजार पेक्षा जास्त जवान हे युद्धपातळीवर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. असं असतांना लष्कराने सुमारे ५०० पॅरा कमांडो हे जम्मू खोऱ्यात उतरवले आहेत अशी माहिती एनडीटीव्हीने एएनआय या वृत्तसंस्थेने हवाल्याने दिली आहे.
पॅरा कमांडो हे लष्कराचे एक विशेष अंग म्हणून ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विशेष मोहिमा, कामिगिरी हे या पॅरा कमांडोंवर सोपवल्या जातात. आता एवढ्या मोठ्या संख्येने पॅरा कमांडोंना दहशतवाद्यांच्या शोधण्यासाठी लष्कराने उतरवल्याने पुढील काही दिवस दहशवादी विरोधातील कारवाईमुळे जम्मू खोरे हे ढवळून निघणार हे निश्चित.
हे ही वाचा… VIDEO : मुलं जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळली, सहा विद्यार्थी जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद
एकूण ५० ते ५५ दहशतवादी जम्मू खोऱ्यातील काही भागात लपले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुप्तचर विभागानेही जम्मू खोऱ्यात यंत्रणा अधिक सक्रिय केली असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या, आश्रय देणाऱ्यांच्या दिशेने तपास सुरु केला आहे.