केरळच्या कोल्लम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका भारतीय लष्कराच्या जवानावर काही अज्ञातांनी हल्ला केला. तसेच आरोपींनी पीडित जवानाचे हात बांधून त्याच्या पाठीवर ‘PFI’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) असं लिहिलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, शाईन कुमार असं पीडित लष्कराच्या जवानाचं नाव आहे. ते कोल्लम जिल्ह्यातील कडक्कल येथील रहिवासी आहेत. रविवारी रात्री काही अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. शाईन कुमार यांच्या घराशेजारी रबराचं जंगल आहे, या जंगलात सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी शाईन कुमार यांचे हात बांधले आणि त्यांच्या पाठीवर हिरव्या रंगाने ‘पीएफआय’ असं लिहिलं.
हेही वाचा- मुंबईत आईला चाकूचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर गँगरेप, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
‘PFI’ अर्थातच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही इस्लामिक संघटना असून काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि सक्तवसुली संचालनालयाने पीएफआय संघटनेवर कारवाई करत अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. अद्याप भारतातील विविध तपास यंत्रणांचं या संघटनेवर बारीक लक्ष आहे.
हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
या मारहाणीप्रकरणी कडक्कल पोलिसांनी शाईन कुमारच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपी नेमके कोण होत? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. आरोपींचा शोध घेतला जात आहे.