जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोही घोषणांमुळे अनेकांच्या टीकेचा लक्ष्य बनलेल्या कन्हैया कुमारने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केल्याचे वृत्त आहे. झी मिडीयाच्या वृत्तानुसार कन्हैयाने भारतीय जवान काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. काल जेएनयू विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने हे वादग्रस्त विधान केले. यावेळी त्याने जम्मू-काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अफास्पा कायद्याविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगितले. या भाषणादरम्यान त्याने भारतीय जवान काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करत असल्याचा खळबळजनक आरोप केल्याची माहिती याठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली.
९ फेब्रुवारीला जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारला अटक केली होती. यावेळी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या न्यायालयाने अंतरिम जामिनावर त्याची मुक्तता केली आहे.

Story img Loader