जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोही घोषणांमुळे अनेकांच्या टीकेचा लक्ष्य बनलेल्या कन्हैया कुमारने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केल्याचे वृत्त आहे. झी मिडीयाच्या वृत्तानुसार कन्हैयाने भारतीय जवान काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. काल जेएनयू विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने हे वादग्रस्त विधान केले. यावेळी त्याने जम्मू-काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अफास्पा कायद्याविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगितले. या भाषणादरम्यान त्याने भारतीय जवान काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करत असल्याचा खळबळजनक आरोप केल्याची माहिती याठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली.
९ फेब्रुवारीला जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारला अटक केली होती. यावेळी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या न्यायालयाने अंतरिम जामिनावर त्याची मुक्तता केली आहे.
भारतीय जवान काश्मीरमध्ये बलात्कार करतात- कन्हैया
जेएनयू विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने हे वादग्रस्त विधान केले
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2016 at 11:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army rapes women in kashmir says jnu student leader kanhaiya kumar