कर्जाची रक्कम परत न केल्याने बँक कर्मचारी आणि कर्जदारांमध्ये वाद झाल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. परंतु आफ्रिकेतील देश युगांडात एका कर्जदाराने अत्यंत टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. येथील एका भारतीय व्यक्तीची कर्जासंदर्भातल्या वादातून ऑफ ड्युटी पोलीस हवालदाराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना बुधवारी युगांडाची राजधानी कम्पाला येथे घडली आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माध्यमांच्या रिपोर्टमधील माहितीनुसार ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे त्याचं नाव उत्तम भंडारी असं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारेकरी पोलीस हवालदार हा ३० वर्षांचा असून त्याचं नाव इव्हान वाबवायर असं आहे. इव्हानने या हत्येसाठी आधी एके – ४७ रायफल चोरली. त्याच रायफलने त्याने उत्तम भंडारींवर गोळ्या झाडल्या. इव्हानवर २१ लाख शिलिंग (४६,००० रुपये) इतकं कर्ज होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की इव्हान वाबवायरने भंडारी यांच्यावर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर बँकेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बँकेतले लोक गोळीबारानंतर पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १३ गोळ्या जप्त केल्या आहेत. कर्जाच्या रक्कमेची परतफेड करण्यावरून पीडित आणि आरोपीमध्ये गैरसमज झाला होता. वाबवायरला १२ मे रोजी कर्जाच्या रकमेची माहिती मिळताच त्याने भंडारी यांच्याशी वाद सुरू केला. कर्जाचा आकडा वाढवल्याचा त्याचा दावा होता. तो काही वेळ शांत उभा होता, नंतर अचानक त्याने बंदूक लोड केली आणि गोळीबार सुरू केला.

हे ही वाचा >> Shivakumar Vs Siddaramaiah : शिवकुमार सिद्धरामय्यांपेक्षा २८ पटींनी श्रीमंत, दोन्ही नेत्यांकडे कोट्यवधींची संपत्ती

दरम्यान, कम्पाला मेट्रोपोलिटन पोलिसांचे प्रवक्ते पॅट्रिक ओनयांगो म्हणाले, भंडारी यांची हत्या करून वाबवायर बंदूक तिथेच टाकून पळून गेला. वाबवायर एक मानसिक रुग्ण आहे. पोलिसांनी सांगितलं की, वाबवायरने त्याच्या रूममेटची बंदूक चोरली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian banker shot dead by off duty uganda police with stolen ak 47 by over loan dispute cctv video asc