नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा ‘पँडोरा पेपर्स’मध्ये समावेश आहे. या धनाढय़ भारतीयांनी करसवलत किंवा संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केली. त्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मा आदींचा समावेश आहे.

सन २०१६ साली अवसायनात गेलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील (बीव्हीआय) एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक (बेनिफिशियल ओनर्स) म्हणून सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांची नावे पँडोरा पेपर्समध्ये आहेत. पँडोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातील ‘अल्कोगाल’ या लॉ फर्ममधील तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची ‘बीव्हीआय’मधील सास इंटरनॅशनल लि. या कंपनीचे बीओ व संचालक म्हणून नावे आहेत.

MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

पँडोरा रेकॉर्डस्मध्ये सासचा पहिला उल्लेख २००७ मध्ये आला आहे. कंपनीच्या मालकांना मिळालेल्या आर्थिक फायद्यांसह अधिक तपशीलवार दस्ताऐवज जुलै २०१६ मध्ये या कंपनीच्या अवसायनापासून उपलब्ध आहेत.

कंपनीच्या अवसायनाच्या वेळी तिचे समभाग नोंदणीकृत किमतीसह समभागधारकांनी खालीलप्रमाणे पुन्हा खरेदी (बायबॅक) केले होते : सचिन तेंडुलकर (९ समभाग)- ८,५६,७०२ पौंड, अंजली तेंडुलकर (१४ समभाग)- १३, ७५,७१४ पौंड, आनंद मेहता (५ समभाग)- ४,५३,०८२ पौंड. अंजली तेंडुलकर यांना ६० समभागांसह पहिले शेअर प्रमाणपत्र मिळाले. तिच्या वडिलांना ३० समभागांसह दुसरे शेअर प्रमाणपत्र मिळाले. उर्वरित समभागांच्या ‘बायबॅक’ बद्दल तपशील उपलब्ध नसले, तरी ९० समभागांची किंमत ८.४६ दशलक्ष पौंड (सुमारे ६० कोटी रुपये) इतकी असावी, असा अंदाज केला जाऊ शकतो.

सचिन तेंडुलकर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत २०१२ ते २०१८ अशी होती आणि यापैकी ४ वर्षे त्याची बीव्हीआयमधील कंपनी अल्कोगालसोबत नोंदणी होऊन काम करत होती. नियमानुसार, ज्याप्रमाणे लोकसभेच्या निर्वाचित खासदारांना त्यांची मालमत्ता व दायित्व यांची वार्षिक यादी सादर करावी लागते, त्याप्रमाणे राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना ती देणे आवश्यक नसते.

जगभरातील कुठल्याही कंपनीत आपली मालमत्ता किंवा उल्लेखनीय आर्थिक हितसंबंध नाहीत, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सांगितले होते. तथापि, रिलायन्सचे एडीए समूहाचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या मालकीच्या किमान १८ परदेशी कंपन्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स व सायप्रस येथे आहेत, असे ‘इंडियन एक्सप्रेस’ने तपास केलेल्या पँडोरा पेपर्सच्या रेकॉर्डसमध्ये उघड झाले आहे.

२००७ ते २०१० या काळात स्थापन करण्यात आलेल्या या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांनी किमान १.३ अब्ज पौंडाचे कर्ज घेऊन या रकमेची गुंतवणूक केली आहे.

यावर्षी फेब्रुवारीत निधन झालेले काँग्रेसचे नेते, गांधी परिवाराचे निष्ठावान, माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांच्या परदेशात कंपन्या व मालमत्ता होत्या, असे पँडोरा पेपर्समध्ये दिसून आले आहे. शर्मा यांची पत्नी स्टेरे, मुले व नातवंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील किमान १० सदस्य हे एका न्यासाचे (ट्रस्ट) लाभार्थी आहेत. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शर्मा यांनी कधीच निवडणूक आयोगाकडे या ट्रस्टची माहिती जाहीर केली नव्हती.

दिशाभूल अशी..

उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता शून्य असल्याचे गेल्या वर्षी एका ब्रिटिश न्यायालयात सांगितले होते. प्रत्यक्षात त्यावेळी त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सायप्रस येथे १८ कंपन्यांमध्ये कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader