Bus Accident : ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत अनेकांन जलसमाधी मिळाली असण्याची शक्यता आहे. ही बस उत्तर प्रदेशातली होती अशीही माहिती समोर आली आहे. पोखराहून काठमांडूच्या दिशेने बस चालली होती त्याचवेळी हा अपघात झाला. एएनआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या अपघाताबाबत काय सांगितलं?

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मर्सियांग्डी नदीत ही बस कोसळली आहे. ही नदी नेपाळच्या तानाहून जिल्ह्यात आहे. या बसचा क्रमांक UP FT 7623 असा आहे. ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने चालली होती. त्यावेळी हा अपघात झाला अशी माहिती दीपककुमार राया यांनी दिली आहे.

pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
BMTC bus driver heart attack death
प्रवाशांनी भरलेली बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू; कंडक्टरच्या एका कृतीनं अनर्थ टळला, थरारक VIDEO व्हायरल

या ठिकाणी ४५ जणांचं बचाव पथक पोहचलं आहे. नेपाळ सश्त्र पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक या ठिकाणी आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक माधव पौडेल यांनी ही माहिती माध्यमांना दिली. बस ज्या ठिकाणी पडली तिथे नदीची पाणी पातळी पावसामुळे वाढली आहे. या बसमध्ये ४० प्रवासी बसले होते आणि सगळे भारतीय होते. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे असंही स्पष्ट करण्यात आलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.