पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझापट्टीपर प्रचंड बॉम्बवर्षाव केला. यात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर असंख्य लोक जखमी झाले. विशेष म्हणजे भारतातील अनेक रहिवासीही इस्रायलमध्ये अडकून पडले होते. अखेर हे नागरिक मायदेशात परतले आणि त्यांनी इस्रायलमधील स्थिती सांगितली.

इस्रायलहून भारतात परत आलेला सुमितने एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं, “तेलअवीव येथे परिस्थिती सामान्य आहे. मात्र, दक्षिण आणि उत्तर इस्रायलमध्ये युद्धाची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही इस्रायलहून भारतात परत आलो. या कामात सरकारने फार चांगलं काम केलं. भारत सरकारने खूप वेगाने २-३ दिवसात आम्हाला प्रतिसाद दिला.”

दरम्यान, या युद्धानंतर इस्रायलमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलक महिला म्हणाल्या, “आम्ही आंदोलन करत आहोत कारण की, महिला, लहान मुलं आणि नागरिकांचं अपहरण केलं जात आहे. त्यांना तत्काळ सोडून दिलं पाहिजे. कारण ते या युद्धाचा भाग नाहीत. शक्य तितक्या लवकर अपहरण करून बंदी बनवण्यात आलेल्यांना सोडून दिलं पाहिजे. बंदी करण्यात आलेल्या नागरिकांच्या अदलाबदलीसाठी इस्रायल सरकारने हमासबरोबर करार करण्यात पुढाकार घ्यावा, असं आम्ही आवाहन करतो.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

“इस्रायल सरकार मागील अनेक वर्षांपासून हमासबरोबर बोलत आहे. त्यामुळे ते आताही कैदी करण्यात आलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बोलू शकतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशही यात मध्यस्थी करू शकतात. त्यांनी महिला आणि मुलांची तत्काळ सुटका करावी. यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी मोजावी,” असं मत आंदोलक महिलांनी व्यक्त केलं.

Story img Loader