Indian Coast Guard Pilots Missing : भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात मदतीसाठी गेलेलं हे हलिकॉप्टर समुद्रात कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एका व्यक्तीला (डायव्हर) बचाव पथकाने वाचवलं आहे. दरम्यान, अरबी समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबी समुद्रात एक जहाज अडकलं होतं. त्यामुळे जहाजातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी तटरक्षक दलाला संदेश पाठवला. तटरक्षक दलाने या जहजावरील लोकांच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट व दोन डायव्हर्स होते. मात्र हे हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहोचायच्या आधीच समुद्रात कोसळलं. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. तर एका डायव्हरला बचाव पथकाने वाचवलं आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पायलट्सना शोधण्यासाठी तटरक्षक दलाने शोहमोहीम हाती घेतली आहे. यासाठी चार जहाजं व दोन विमानं पाठवण्यात आली आहेत. तिघेही लवकरच सापडतील असा विश्वास तटरक्षक दलाने व्यक्त केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाने या घटनेनंतर एक निवदेन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की इंडियन कोस्ट गार्डच्या एका अ‍ॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरने अलीकडेच गुजरातमध्ये वादळ आलं तेव्हा ६७ लोकांजा जीव वाचवला होता. तेच हेलिकॉप्टर सोमवारी रात्री ११ वाजता अरबी समुद्रात अडकलेल्या एका जहाजावरील लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलं होतं. भारतीय झेंडा असलेल्या हरी लीला या जहाजावरील जखमी क्रू मेंबर्सच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं. मात्र, पोरबंदर किनाऱ्यापासून ४५ किमी दूर अरबी समुद्रात ते अपघातग्रस्त झालं आहे.

हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले

तटरक्षक दलाने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. बचाव मोहिमेदरम्यान तातडीने हेलिकॉप्टरचं लँडिंग करावं लागलं. हेलिकॉप्टरमधील एका डायव्हरला वाचवण्यात आम्हाला यश मिळालं आहे. उर्वरित तीन जणांचा शोध घेतला जात आहे. तसेच हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले आहेत. जिथे हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले त्याच्या आसपास शोधमोहीम सुरू आहे.

हे ही वाचा >> Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग

गुजरातमध्ये तटरक्षक दलाची बचाव मोहीम

गुजरातमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान, पोरबंदर किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाने एक बचाव मोहीम हाती घेतली होती. तटरक्षक दलाने मुसळधार पावसात व पुरात अडकलेल्या ६० जणांना वाचवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian coast guard helicopter hard landing in arabian sea three people including pilot missing asc