Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाला रोखून मच्छिमारांची सुटका केली. मात्र, त्यापूर्वी सुमारे दोन तास पाठलाग केला आणि त्यानंतर भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका केली. जवळपास दोन तास फिल्मी स्टाईल हा थरार सुरु होता.
या सात मच्छिमारांना भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने पकडले होते. भारतीय मच्छीमारांना पकडून घेऊन जात असल्याचं भारतीय तटरक्षक दलाला समजताच तब्बल दोन तास पाठलाग करत भारतीय तटरक्षकाने मच्छिमारांना वाचवलं. हा प्रकार घडत असताना कोणत्याही परिस्थितीत भारतीय मच्छिमारांना नेता येणार नाही, असा इशारा देत मच्छिमारांची सुटका केली. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
हेही वाचा : Santiago Martin : ईडीची मोठी कारवाई, २२ ठिकाणी छापे; तब्बल १२ कोटींची रोकड जप्त
दरम्यान, तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत होती आणि तटरक्षक दलाने पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग करून त्यांना रोखलं आणि मच्छिमारांची सुटका केली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, १७ नोव्हेंबर रोजी भारतीय तटरक्षकाच्या जहाजाला भारतीय मच्छिमारांच्या बोटीचा कॉल आला होता.
#WATCH | Indian Coast Guard Ship Agrim chasing Pakistani ship PMSA Nusrat to rescue Indian fishermen who were being taken to Pakistani waters on Sunday, November 17. The Indian Coast Guard managed to rescue Indian fishermen.
— ANI (@ANI) November 18, 2024
(Source: Indian Coast Guard) https://t.co/fdigpCelvN pic.twitter.com/23w67dt33w
पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ ७ भारतीय मच्छिमारांना दुपारी साडेतीनच्या सुमारास पकडल्याची माहिती संदेशात देण्यात आली. ही माहिती मिळताच तटरक्षक दलाने त्या भागाकडे धाव घेत पाकिस्तानी जहाजाला रोखून भारतीय मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक जहाज ॲडव्हान्सने मच्छिमारांना वाचवण्यासाठी दोन तास पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग केला.