नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरची राज्यघटना ही भारताच्या राज्यघटनेच्या तुलनेत निम्नस्तरावर असून भारताचे संविधान हे त्याहून श्रेष्ठ आहे, या केंद्र सरकारच्या भूमिकेशी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी सहमती दर्शविली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान ही सहमती दर्शविण्यात आली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. मात्र, पूर्वाश्रमीच्या या राज्याची घटनासभा, जी १९५७ मध्ये बरखास्त करण्यात आली, ही प्रत्यक्षात विधानसभा होती, हा केंद्र सरकारचा दावा मात्र सर्वोच्च न्यायालयाला पटला नसल्याचे दिसते आहे.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sharad pawar approaches supreme court over clock symbol print politics
घडयाळ चिन्हाबाबत १५ ऑक्टोबरला सुनावणी; चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची न्यायालयाला विनंती
Gujarat government petition in Bilkis Bano case fatal in Supreme Court
बिल्किस बानोप्रकरणी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Supreme Court Questions on Baijuj Case Verdict print eco news
बैजूज प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न
sanjay gandhi national park contribution to mumbai is more than the bmc budget
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे योगदान हे महापालिकेच्या अर्थसंकल्पापेक्षा भरीव; उच्च न्यायालयाची टिप्पणी
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?

हेही वाचा >>> कोटय़ात आठ महिन्यांत २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; शैक्षणिक स्पर्धेच्या ‘फॅक्टरीं’वर प्रश्नचिन्ह

 जम्मू-काश्मीरमधील दोन प्रमुख पक्षांचे नाव न घेता केंद्र सरकारने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या पूर्वाश्रमीच्या राज्याला विशेष दर्जा देण्याची तरतूद ही भेदभावात्मक नाही, तर विशेषाधिकाराची आहे, असा गैरप्रचार नागरिकांत करण्यात आला. आजही हे दोन राजकीय पक्ष या न्यायालयापुढे अनुच्छेद ३७० आणि ‘३५ अ’चा पुरस्कार करीत आहेत, असे महान्यायअभिकर्त्यांनी ११ दिवसांच्या सुनावणीदरम्यान  सांगितले होते. भारताच्या राज्यघटनेपेक्षा जम्मू-काश्मीरची राज्यघटना ही कनिष्ठ स्तरावर असून त्या राज्याची घटनासभा ही प्रत्यक्षात कायदे तयार करणारे विधिमंडळ होते, हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा आहे, असा दावा महान्यायअभिकर्ता तुषार  मेहता यांनी केंद्र सरकारतर्फे केला होता. 

हेही वाचा >>> मुझफ्फरनगरमधील वादग्रस्त शाळा तिसऱ्या दिवशीही बंद

त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाच्या अधीन राहून एका स्तरावर तुमचा युक्तिवाद योग्य असू शकतो. जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेच्या तुलनेत भारतीय राज्यघटनेचा दस्तावेज हा उच्च स्तरावर आहे, या तुम्ही मांडलेल्या बाजूवर आम्ही हे सांगतो आहोत. पण त्याचवेळी तुमच्या युक्तिवादाची दुसरी बाजू स्वीकारणे कठीण आहे. जम्मू-काश्मीरची घटनासभा ही खरेतर विधानसभा असून अनुच्छेद ३७० च्या परंतुकात विशेषत्त्वाने नमूद केल्याप्रमाणे या घटनासभेने तिच्या मंजुरीनंतर काही विशिष्ट विषय राज्याच्या अखत्यारित ठेवले आहेत, असे तुमचे म्हणणे आहे.

प्राध्यापकाचे निलंबन का?

* जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या डॉ. झरूर अहमद भट या जम्मू आणि काश्मीरमधील प्राध्यापकाला निलंबित का करण्यात आले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली. या मुद्दय़ावरील घटनापीठासमोर प्रलंबित असलेल्या २० पेक्षा जास्त याचिकांवर सोमवारी पुढे सुनावणी सुरू झाली.

*  महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनीही डॉ. भट यांना निलंबित करण्याची वेळ योग्य नसल्याचे मान्य केले. केवळ घटनापीठासमोर युक्तिवाद केल्यामुळे निलंबन होत असेल तर हा सूड उगवण्याचा प्रकार आहे, मग स्वातंत्र्याचे काय, असे न्या. भूषण गवई यांनी विचारले.