अमेरिकेतून एक भारतीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मूळचा हैदराबादच्या नचराम भागातील रहिवासी असलेला २५ वर्षीय युवक मोहम्मद अब्दुल अरफात ७ मार्च पासून अमेरिकेच्या क्लीवलँडमधून बेपत्ता झाला आहे. अजूनही त्याला शोधण्यात यश आलेलं नाही. अरफातचे वडील मोहम्मद सलीम यांनी मुलाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना या प्रकरणी मदत करावी असं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून सलीम यांनी परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टन डीसी तसेच शिकागो येथील भारतीय दूतावासांना आपल्या मुलाच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा करण्याची मागणी केली आहे.

१ लाख रुपयांची खंडणी मागितली

मोहम्मद अब्दुल अरफातच्या आई वडिलांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की काल एका अनोळखी नंबरवरुन खंडणीसाठी कॉल आला होता. कॉल करणाऱ्यांनी त्यांना मुलाचं अपहरण झाल्याचं सांगून, त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी १ लाख रुपये खंडणी मागितली. सोबतच त्यांनी पैसे दिले नाही तर त्यांच्या मुलाची किडनी विकायला काढू अशी धमकीही दिली. परंतु पैसे कोणत्या प्रकारे पाठवायचे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. अरफातसोबत एकदा कॉलवर बोलू द्या अशी विचारणा केल्यावर नकार देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
Sunil Shelke, Ajit Pawar NCP, Maval candidate MLA Sunil Shelke,
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 news in marathi
निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा; वाचा कुठे घडला हा प्रकार?
Ranthambore National Park 25 tigers missing
७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय…
Hemant Godse On Chhagan Bhujbal :
Hemant Godse : महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसला’

गेल्यावर्षी क्लिवलँड विद्यापीठात घेतला होता प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार अरफातने गेल्यावर्षी मे महिन्यात क्लिवलँड विद्यापीठात आयटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. अमेरिकेतील ओहायो शहरात तो राहात होता. ७ मार्चला त्याच्यासोबत शेवटचं कॉलवर बोलणं झाल्याचं वडील सलीम यांनी सांगितलं. दरम्यान अरफात बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे मदत मागितली आहे. मुलाला सुरक्षित परत आणण्यासाठी अरफातच्या आई-वडिलांनी केंद्र सरकारने योग्य ती आणि तातडीची कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

भारतीय दूतावासाने काय म्हटलं?

या प्रकरणी न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाने एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात आम्ही याप्रकरणी अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या कायम संपर्कात आहोत असं सांगितलं आहे. अरफातला शोधण्यासाठी पूर्ण ताकद लावली जात असून लवकरच त्याचा शोध घेऊ असंही नमूद केलं आहे. दरम्यान अरफात बेपत्ता झाल्याचं समजताच अरफातच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर क्लिवलँड पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

याआधीही अशा घटना घडल्या आहेत

अरफातबाबतच्या या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अरफातचं हे प्रकरण काही पहिलं प्रकरण नाही तर याआधीही अशा घटना घडल्या असून हा अतिशय चिंतेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशातील अभिजित नावाचा विद्यार्थी अमेरिकेत मृत अवस्थेत सापडला होता. जंगलामध्ये एका चारचाकी गाडीमध्ये त्याचा मृतदेह अमेरिकेच्या पोलिसांना सापडला होता. अभिजित बोस्टन विद्यापीठात इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होता. त्याआधी फेब्रुवारीमध्ये समीर कामतचा मृत्यू झाला होता. पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या समीरला तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. तो इंडियाना शहरात मृत अवस्थेत आढळून आला होता. तर जानेवारीमध्ये १८ वर्षीय अकुल धवन हा इलिनॉय विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी विद्यापीठ परिसरात मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू थंड तापमान सहन न झाल्यामुळे झाला होता असं सांगण्यात आलं होतं.