आपल्या अपत्याला रागावल्याच्या कारणावरून नॉर्वेतील भारतीय दाम्पत्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने या प्रकरणाला निराळेच वळण लाभण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर दाम्पत्याला एक वर्ष तीन महिन्यांची शिक्षा ठोठावावी, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
चंद्रशेखर वल्लभनेनी आणि त्यांची पत्नी अनुपमा असे या दाम्पत्याचे नाव असून ते आंध्र प्रदेशातील आहेत. कारवाई टाळण्यासाठी ते भारतात पळून जातील या भीतीने त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ओस्लोमधील न्यायालयात या बाबत ३ डिसेंबर रोजी निकाल देण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. शाळेच्या बसमध्येच या दाम्पत्याच्या मुलाने अंतर्वस्त्रातच लघुशंका केली होती. याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी मुलास, असा प्रकार पुन्हा घडल्यास, मायदेशी पाठवून देण्याची धमकी दिली, असे चंद्रशेखर यांचा पुतण्या व्ही. शैलेंद्र यांनी सांगितले.

Story img Loader