पॅँट ओली करणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला रागावणे नॉर्वेतील भारतीय दाम्पत्याला चांगलेच महाग पडले आहे. मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पालकांना नॉर्वे पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. नॉर्वेतील भारतीय दूतावासानेही या अटकेची दखल घेतली असून या प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्हय़ातील रहिवासी असलेले व्ही. चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी अनुपमा यांना नॉर्वे पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती चंद्रशेखर यांचे पुतणे व्ही. शैलेंद्र यांनी दिली.आपल्या चुकांबद्दल आई-वडील आपल्याला भारतात पाठविण्याची शिक्षा करणार असल्याची तक्रार चंद्रशेखर यांच्या मुलाने नऊ महिन्यांपूर्वी त्याच्या शाळेत केली होती. त्यानंतर चंद्रशेखर दाम्पत्याविरोधात नार्वेमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.आपल्या काकांना सुरुवातीला या प्रकरणाबाबत काहीच माहिती नव्हती. ते आपल्या पत्नी आणि मुलासह जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये भारतामध्येच होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात नॉर्वेत परत गेल्यानंतर त्यांना या विषयाची नोटीस मिळाली. नॉर्वे पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी गुरुवारी दिली असल्याचे शैलेंद्र यांनी स्पष्ट केले.मुलांच्या संगोपनाबाबत नॉर्वेमधील कायदे चांगलेच कडक आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा