भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याची पत्नी हसिन जहाँने केला आहे.  फेसबुकवर तिने मोहम्मद शमीचे तरुणींसोबतच व्हॉट्स अॅपवरील चॅटचे स्क्रीनशॉटही अपलोड केले आहेत. या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोहम्मद शमीची पत्नी हसिन जहाँने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. तिने शमीचे तरुणींसोबतचे छायाचित्र तसेच तीन तरुणींसोबतचे व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरील चॅटचे स्क्रीनशॉटही टाकले आहेत. ‘मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध आहेत’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा तिचा आरोप आहे. मात्र, पतीसोबतच तिने त्या तरुणींनाही जबाबदार धरले आहे. शमीच्या पत्नीची फेसबुकवरील पोस्ट आता व्हायरल झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यावर शमीने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोपही तिने केला आहे. अद्याप शमीने या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोहम्मद शमीने २०१४ मध्ये कोलकात्यातील हसिन जहाँशी लग्न केले. त्यांना एक मुलगीदेखील आहे. पत्नीसोबतचे पाश्चिमात्य पोषाखांमधले फोटो फेसबूकवर टाकल्याने शमीला लोकांनी ट्रोल केले होते. शमीने ३० कसोटी आणि ५० वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ७ टी-२० सामन्यांमध्येही तो भारताकडून खेळला आहे. शमी सध्या देवधर चषकात भारत अ संघाकडून खेळत आहे.