जटिल भौतिक घटनांच्या अभ्यासाचे समीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या जटिल भौतिक घटनांचा अभ्यास करण्याचे समीकरण तयार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. अभय अष्टेकर यांना  प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार  नुकताच प्रदान करण्यात आला.

अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या (एपीएस) वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. एपीएस ही भौतिक शास्त्रज्ञांची जगातील दुसऱ्या क्रमांकांची संस्था आहे. अष्टेकर यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप १० हजार डॉलर असे आहे.

अल्बर्ट आइन्स्टाइनने काही दशकांपूर्वी वर्तवलेल्या गुरुत्वाकर्षणासंबंधीची भविष्यवाणी समजून घेण्यासाठी अष्टेकर यांनी १९८७मध्ये गणितीय समीकरण मांडले. त्यालाच लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी सिद्धान्त किंवा अष्टेकर व्हेरीअबल्स असे म्हटले जाते. जगातील अनेक शास्त्रज्ञ या सिद्धांतावर आधारित संशोधन करीत आहेत. अष्टेकर यांनी क्वॉंटम फिजिक्स आणि सामान्य सापेक्षता यांच्या एकत्रीकरणातून लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताचा आज महत्त्वाचा घटक आहे. कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या प्रचंड घटना उलगडून सांगण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करण्यात येत आहे.

काळ आणि वेळेचे स्वरूप, एकरेषीय नसलेल्या सामान्य सापेक्षतेतील गुरुत्वीय लहरी, महास्फोट, कृष्णविवरांमधील ऊर्जेचे स्वरूप याबद्दलची जगाची समज अष्टेकर यांच्या संशोधनामुळे वाढली, असे एपीएसने म्हटले आहे.

मुंबई ते अमेरिका

डॉ. अभय अष्टेकर हे सामान्य सापेक्षता आणि क्वॉंटम ग्रॅव्हिटी या क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. डॉ. अष्टेकर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ ग्रॅव्हिटेशन अ‍ॅण्ड द कॉसमॉस या संस्थेचे संचालक आहेत. त्यांचा जन्म ५ जुलै १९४९ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ात शिरपूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. त्यांनी मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात उच्चशिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स संस्थेतून बीएस्सी पदवी घेऊन ते गुरुत्वाकर्षण या विषयात पीएचडी करण्यासाठी विसाव्या वर्षी अमेरिकेला गेले. त्यांनी टेक्सास विद्यापीठातून गुरुत्वाकर्षण विषयात पदवी मिळवली. त्यांनी १९७४मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी मिळवली. अनेक प्रसिद्ध विद्यापीठांत त्यांनी अध्यापन केले आहे. फ्रान्स, भारत आणि कॅनडातही त्यांनी संशोधनकार्य केले आहे.

गुरुत्वाकर्षण विज्ञान या क्षेत्रातील कार्याबद्दल ‘एपीएस’ने केलेला हा सर्वात मोठा सन्मान आहे. पहिल्या आइन्स्टाइन पुरस्काराने पीटर बर्गमन आणि जॉन व्हीलर यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी संशोधकांचे लहान लहान गट तयार करून अमेरिकी विद्यापीठांना सामान्य सापेक्षता सिद्धांताची ओळख करून दिली होती.

– डॉ. अभय अष्टेकर