भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांना सार्वजनिक ठिकाणी अटक करून त्यांचा अपमानच करण्यात आला आहे आणि याप्रकरणी अमेरिकेची काय प्रतिक्रिया आहे, याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी येथे सांगितले.देवयानी खोब्रागडे या आपल्या कन्येस शाळेत सोडण्यासाठी गेल्या असता व्हिसामध्ये गैरप्रकार केल्याच्या आरोपाखाली त्यांना न्यूयॉर्क येथे सर्वासमक्ष अटक करून बेडय़ाही ठोकण्यात आल्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. याप्रकरणी आपण दोषी नसल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अडीच लाख अमेरिकी डॉलर्सच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा