ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ होते. पद्मश्रीनं सन्मानित झालेल्या देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्यानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता. संस्थेच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांच्या हकालपट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देबरॉय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी असं व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविधांगी विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. देशातल्या अव्वल धुरिणांच्या मांदियाळीत त्यांचं नाव घेतलं जातं. देशाच्या ज्ञानकेंद्रित परंपरेत त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि राहील. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते वाकबगार होते. याव्यतिरिक्त ऐतिहासिक दस्तावेज तरुणांपर्यंत कसे पोहोचतील यासाठीही त्यांनी अविरत काम केलं’, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘बीपीएल’चे संस्थापक टीपीजी नांबियार यांचे निधन

‘देबरॉय यांच्या जाण्याने देश एका ज्ञानी माणसाला मुकला’, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ‘देशातल्या कीर्तीवंत अर्थतज्ज्ञांपैकी ते एक होते. त्यांचं लिखाण सर्वसमावेशक आणि अभ्यासपूर्ण असे. ध्येयधोरणं ठरवताना त्यांचा व्यासंग नेहमीच मार्गदर्शक ठरत असे. देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचं मोलाचं योगदान होतं. वर्तमानपत्रांमधील त्यांचं लिखाण वाचकांना समृद्ध करत असे. अर्थविश्वाला त्यांची उणीव नेहमीच भासेल’, अशा शब्दांत प्रधान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बिबेक देबरॉय यांचा जीवनप्रवास

ि

t

y

१९५५ साली जन्मलेल्या देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून तसंच ट्रिनिटी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरणं ठरवताना देबरॉय यांचा सिंहाचा वाटा होता. नीती आयोगाचे सदस्य राहिलेल्या देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्यामुळेच भारतीय रेल्वे हा उपक्रम हा जगातल्या सर्वोत्तम अशा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक होऊ शकला.

देशाच्या शाश्वत विकासाला हातभार लागेल या दृष्टिकोनातून विदाकेंद्रित धोरणं आखण्यात त्यांचा हातखंडा होता. देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व कळावं यासाठीही त्यांनी सातत्याने काम केलं.

भारतीय पौराणिक ग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर करुन त्यांनी जगासमोर नवा दृष्टिकोन मांडला. आधुनिक जगातील प्रश्न-समस्यांच्या निराकरणात भारतीय संस्कृतीने दिलेली मूल्यं आणि कार्यपद्धती चिरंतन ठरेल असा त्यांचा विश्वास होता.