इंडोनेशियात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी भारत सरकारने अखेर अधिकृत संपर्क साधला आहे. इंडोनेयशियातील भारतीय दूतावास अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी रविवारी छोटा राजनची भेट घेतली. राजनच्या प्रत्यार्पण कराराबाबत भारताची इंडोनेशियासोबत बोलणी सुरू आहे. यापार्श्वभूमीवरच अग्रवाल यांनी आज छोटा राजनची भेट घेतल्याचे कळते. मात्र, या भेटीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. भारताच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या छोटा राजनला २४ ऑक्टोबरला इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली होती. अटकेच्या पुढच्याच दिवसापासून त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

Story img Loader