Indian Express Power List 2025 : इंडियन एक्स्प्रेसने भारतातत्या १०० प्रभावी लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अर्थातच नरेंद्र मोदी, गौतम अदाणी यांची नावं आहेत. शिवाय महाराष्ट्रातली नावंही आहेतच. पण एकही ठाकरे या यादीत नाहीत. १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्रातली किती नावं आहेत जाणून घेऊ.

नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा यश मिळवल्यानं भाजपाचं महत्त्व देशभरात वाढलं

नरेंद्र मोदी यांनी एनडीएसह लोकसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला आहे. अर्थात २०२४ ची लोकसभा निवडणूक ४०० पार वगैरे नेणारी नव्हती. इंडिया आघाडीने भाजपा आणि एनडीएला तगडी टक्कर दिली यात काहीच शंका नाही. तसंच भाजपासह महायुतीला महाराष्ट्रातही तगडं बहुमत मिळालं. यानंतर देशातल्या राजकारणात, समाजकारणात अनेक गोष्टी, घडामोडी बदलल्या. दरम्यान देशातल्या १०० प्रभावी लोकांची यादी इंडियन एक्स्प्रेसने तयार केली आहे. या यादीत महाराष्ट्रातल्या किती जणांचं स्थान आहे? आपण जाणून घेऊ.

यादी फक्त राजकारण्यांची नावं नाहीत

ही यादी फक्त राजकारण्यांची आहे का? तर तसंही नाही. देशभरात चर्चेत राहिलेल्या प्रभावी लोकांची ही यादी आहे. यामध्ये गौतम अदाणी, योगी आदित्यनाथ, राहुल गांधी ही नावंही आहेतच. राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यासह १०० प्रभावशाली व्यक्तींचीही ही यादी आहे. आपण जाणून घेऊ कोण कोण आहे या यादीत?

भारतातील १०० प्रभावी व्यक्तींची यादी

१) नरेंद्र मोदी
२) अमित शाह<br>३) एस. जयशंकर
४) मोहन भागवत
५) निर्मला सीतारमण
६) योगी आदित्यनाथ
७) राजनाथ सिंह
८) अश्विनी वैष्णव
९) राहुल गांधी
१०) मुकेश अंबानी
११) गौतम अदाणी
१२) पियूष गोयल
१३) देवेंद्र फडणवीस
१४) एन. चंद्राबाबू नायडू
१५) नितीन गडकरी
१६) संजय मल्होत्रा
१७) भूपेंदर यादव
१८) ममता बॅनर्जी
१९) हरदीप सिंग पुरी
२०) सिद्धरामय्या
२१) नितीश कुमार
२२) धर्मेंद्र प्रधान
२३) एम. के. स्टॅलिन
२४) जय शाह
२५) एन चंद्रशेखरन
२६) नीता अंबानी
२७) जनरल उपेंद्र द्विवेदी
२८) अनुमला रेवंथ रेड्डी
२९) शिवराज सिंह चौहान
३०) नोएल नवल टाटा
३१) हिमंता बिस्वा सरमा
३२) पुष्कर धामी
३३) मल्लिकार्जुन खरगे
३४) मनसुख मांडवीय
३५) अजित डोवल
३६) विश्वनाथन आनंद
३७) उदय कोटक
३८) नायब सिंग सैनी
३९) मनोहर लाल खट्टर
४०) हेमंत सोरेन
४१) पिनरयी विजयन
४२) बीएल संतोष
४३) शक्तिकांता दास
४४) भगवंत मान
४५) संजीव खन्ना
४६) ओमर अब्दुल्ला
४७) दीपेंदर गोयल
४८) रोहीत शर्मा
४९) राजीव बजाज
५०) जे. पी. नड्डा
५१) एकनाथ शिंदे
५२) अरविंद केजरीवाल
५३) तुषार मेहता
५४) राजीव रंजन
५५) सरबंडाना सोनवाल
५६) ज्योतिरादित्य सिंधिया
५७) अजित पवार<br>५८) किरण रिजेजू
५९) चिराग पासवान
६०) सी. आर. पाटील
६१) प्रेमा खंडू
६२) विष्णू देव साई
६३) प्रमोद सावंत
६४) भूपेंद्र पटेल
६५) रेखा गुप्ता
६६) मोहन यादव
६७) भजनलाल शर्मा
६८) सुनील भारती मित्तल
६९) प्रताप सी रेड्डी
७०) अरविंद श्रीनिवास
७१) अजय कुमार भल्ला
७२) विराट कोहली
७३) कोनिडेला पवन कल्याण
७४) विजय
७५) टीव्ही सोमनाथन
७६) निखिल कामथ
७७) शरद पवार
७८) पी. के. शर्मा
७९) मनोज सिन्हा
८०) किरण नाडार
८१) प्रियांका गांधी वाड्रा
८२) शशी थरुर
८३) जसपित बुमराह
८४) तुहीन कांता पांडे
८५) डी. के. शिवकुमार
८६) तेजस्वी यादव
८७) अखिलेश यादव
८८) गजेंद्र सिंग शेखावत
८९) असदुद्दीन ओवैसी
९०) एच. डी. कुमारस्वामी
९१) कुमार मंगलम बिर्ला
९२) अल्लू अर्जुन
९३) रामदेव
९४) सुखविंदर सिंग सुखू
९५) व्ही. नारायणन
९६) करण जोहर
९७) शाहरुख खान
९८) दिलजीत दोसांज
९९) अमिताभ बच्चन<br>१००) आलिया भट्ट

१०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्रातली किती नावं?

मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पियूष गोयल, अजित पवार, शरद पवार हीच नावं आहेत. १२ व्या क्रमांकावर पियूष गोयल, १३ व्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस, १५ व्या क्रमांकावर नितीन गडकरी, ५१ व्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, ५७ व्या क्रमांकावर अजित पवार आहेत. तर शरद पवार ७७ व्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातली सात नावं या यादीत आहेत. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंपैकी एकही नाव या यादीत नाही. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, करण जोहर, शाहरुख खान या सेलिब्रिटींचीही नावं आहेत.